मोदी, योगींचे चित्र काढल्याने मुस्लिम महिलेला दिले हाकलून

वृत्तसंस्था
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

नगमाचे वडिल समशेर खान यांनी तिला पतीकडून मारहाण झाल्याची तक्रार दाखल केली आहे. तिने मोदी आणि आदित्यनाथ यांचे चित्र घरात काढल्याचे कारणामुळे हे सर्व झाल्याचे सांगितले. तिच्या पतीचे मानसिक संतुलन बिघडल्यानेच नगमाला घराबाहेर हकलल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बलिया - उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात एका मुस्लिम महिलेने घरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे चित्र (पेटिंग) काढल्याने तिला घराबाहेर हकलून दिल्याची घटना घडली आहे.

बलिया जिल्ह्यातील बसारीकपूर येथे ही घटना घडली असून, या एका कारणामुळे महिलेला घरातून हकलून देण्यात आले आहे. नगमा प्रवीण असे या महिलेचे नाव असून, तिचा परवेझ खान याच्याशी नोव्हेंबर 2016 मध्ये विवाह झाला होता. नगमाने पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचे चित्र घरात काढले होते. यामुळे चिडलेल्या तिच्या पतीने तिला घराबाहेर हकलून दिले. नगमाचे वडील बलिया जिल्ह्यातील मातारी गावात राहतात. त्यामुळे ती थेट वडिलांकडे गेली आणि त्याबद्दल माहिती दिली. 

नगमाचे वडिल समशेर खान यांनी तिला पतीकडून मारहाण झाल्याची तक्रार दाखल केली आहे. तिने मोदी आणि आदित्यनाथ यांचे चित्र घरात काढल्याचे कारणामुळे हे सर्व झाल्याचे सांगितले. तिच्या पतीचे मानसिक संतुलन बिघडल्यानेच नगमाला घराबाहेर हकलल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बलियाचे पोलिस अधीक्षकांनी याबाबतची तक्रार दाखल करून घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे.