राहुल गांधी ऑक्‍टोबरमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष होण्याची शक्‍यता

पीटीआय
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईलींचे संकेत

हैदराबाद : राहुल गांधी यांना अंतर्गत निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारायला आवडेल, असे सांगतानाच वरिष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एम. वीरप्पा मोईली यांनी पुढील महिन्यात ऑक्‍टोबरमध्येच ते अध्यक्षपदाची धुरा स्वीकारू शकतात, असे संकेत दिले.

राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वीच पक्षाने सांगितल्यास महत्त्वाची जबाबदारी स्वीकारण्यास आपण पूर्णपणे तयार असल्याचे म्हटले होते. राहुल यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणे पक्षासाठी फायदेशीर ठरेल, असे मोईली यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, की राहुल यांनी तातडीने काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली पाहिजेत. हे पक्षासाठी तसेच देशासाठीही चांगले ठरेल. यामध्ये उशीर होत असल्याचे पक्षामधील प्रत्येकालाच वाटत आहे. आता राहुल संघटनात्मक निवडणुकीची प्रतीक्षा करत आहेत. केवळ निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातूनच काँग्रेसचे अध्यक्ष बनणे त्यांना आवडेल.

राज्यांमधील अंतर्गत निवडणूक प्रक्रिया या महिन्यात पूर्ण होईल, अशी अपेक्षा असल्याचे मोईली यांनी नमूद केले. त्यामुळे पुढील महिन्यात ते अध्यक्ष बनतील, अशी शक्‍यताही त्यांनी व्यक्त केली.

काही राज्यांतील आगामी विधानसभा आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राहुल गांधी यांनी शक्‍य तितक्‍या लवकर पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली पाहिजेत. कारण, त्यांचा नवा दृष्टिकोन आणि नवी पद्धत आहे.
- वीरप्पा मोईली, माजी केंद्रीय मंत्री