स्कूल बॅगचे ओझे तेलंगणमध्ये हलके

वृत्तसंस्था
बुधवार, 19 जुलै 2017

हैदराबाद : तेलंगण राज्य सरकारने लहान मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ नये म्हणून स्कूल बॅगच्या वजनावर मर्यादा घातली असून, प्राथमिक ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही मर्यादा लागू असेल. इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅगचे वजन (पुस्तके आणि वह्यांसह) दीड किलोग्रॅमपेक्षा अधिक असता कामा नये, असे सरकारी आदेशामध्ये नमूद करण्यात आले असून, तिसरी ते चौथीसाठी ही मर्यादा 2 ते 3 किलोग्रॅम एवढी आहे.

सहावी ते सातवीसाठी ही मर्यादा 4 किलोग्रॅम, आठवी ते नववीसाठी 4.50 किलोग्रॅम आणि दहावीसाठी 5 किलोग्रॅम एवढी निर्धारित करण्यात आली आहे. तसे आदेश शाळेच्या व्यवस्थापनांना देण्यात आले आहेत. सध्या काही शाळांमध्ये प्राथमिकस्तरावरील विद्यार्थ्यांच्या दफ्तराचे ओझे 6 ते 12 किलोग्रॅम एवढे आढळून आले असून माध्यमिकसाठी ते 17 किलोग्रॅम एवढे आहे. याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सरकारने स्कूल बॅगसाठी वजनाची अट घातली आहे.