एमबीबीएसला प्रवेश न मिळाल्याने पत्नीचा खून

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

हैदराबाद: वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम (एमबीबीएस) प्रवेशास पात्र न ठरल्याने पतीने पत्नीला जाळल्याची घटना येथे नुकतीच घडली. याप्रकरणी विवाहिता हरिका कुमारच्या पालकांनी फिर्याद दिली असून, तिचा पती ऋषी कुमार व त्याच्या आईवडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.

ऋषी कुमार (वय 26) हा सॉफ्टवेअर अभियंता आहे. त्याने रविवारी (ता.17) रात्री हरिकाच्या आईला घरी बोलावून तिने स्वतःला जाळून घेतल्याचे सांगितले; पण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली तेव्हा हा खुनाचा प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ऋषीने पत्नीचा खून केल्याचा संशय असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त (एलबी नगर विभाग) वेणुगोपाळ राव यांनी दिली. हरिका व ऋषीचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. ती वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा देत होती; पण यंदाही ती त्यात यशस्वी होऊ शकली नाही. दंतवैद्यक अभ्यासक्रमाला तिला प्रवेश मिळाला होता; पण ऋषी यावर नाखूष होता आणि हरिकाला घटस्फोट देण्याची धमकी त्याने दिली होती, असे तिच्या पालकांनी पोलिसांना सांगितले. तिचा हुंड्यासाठीही छळ करण्यात येत होता, अशी तक्रार त्यांनी केली.

Web Title: hyderabad news Wife's murder due to lack of access to MBBS