हैदराबादला पावसामुळे सात जण मृत्युमुखी

वृत्तसंस्था
बुधवार, 31 ऑगस्ट 2016

हैदराबाद - मुसळधार पावसाचा फटका दिल्ली पाठोपाठ हैदराबादला बसला असून, येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. या पावसामुळे आतापर्यंत सात जण मरण पावले असून, त्यातील तीन जण भिंत कोसळल्याने मरण पावले आहेत. त्यातील तीन जण हे रामनथपूर येथील असून उर्वरित चौघे भोलकपूर भागातील आहेत. इमारतीची भिंत कोसळून झालेल्या अपघातामुळे संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे मृतांच्या नातेवाइकांना एक लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली आहे.

मुसळधार पाऊस सुरू असल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सरकारने कर्मचाऱ्यांना कार्यालयात एक तास उशिराने येण्याची परवानगी दिली आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवस आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये 15 वर्षांतील झाला नाही इतक्‍या मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तविली आहे.
मुसळधार पावसामुळे महापालिका आयुक्तांनी पुढील एक तास शहरातून न फिरण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. केवळ मनपाचे कर्मचारी आणि आपत्कालीन व्यवस्थापनच्या कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे. शहरातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आयुक्त मुख्य सचिवांची भेट घेण्याची शक्‍यता आहे. या पावसामुळे शहरातील अनेक भागांतील वाहतूक विस्कळित झाली आहे.

रायलसीमा भागात पूर
मुसळधार पावसामुळे रायलसीमा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात पूर आला आहे. पावसामुळे धरणे भरली आहेत. त्याचप्रमाणे तिरुमला येथे अनेक यात्रेकरू अडकले आहेत.

Web Title: Hyderabad rains killed seven people