हैदराबादमध्ये पुन्हा 'सैराट'; नाना नका मारू मला...

Hyderabad sairat woman marries Dalit, father attacks them & chops off her hand
Hyderabad sairat woman marries Dalit, father attacks them & chops off her hand

हैदराबादः तेलंगणच्या नालगोंडा जिल्ह्यात ऑनर किलिंगची घटना ताजी असतानाच हैदराबादमध्ये आणखी एक घटना घडली आहे. मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून संतप्त होऊन दारू प्यायलेल्या वडिलांनी मुलगी व जावयावर धारदार शस्त्राने हल्ला केला. मुलीचे हात तोडले असून जावई या हल्ल्यात जखमी झाला आहे. यावेळी नाना थांबा... नका मारू मला... अशी विनवणी करत होती.

हैदराबादच्या मध्यवर्ती भागात बुधवारी (ता. 19) दुपारी ही घटना घडली. बंजारा हिल्स पोलिसांनी मुलीचे वडील मनोहर चारी (वय 42) याला त्याच दिवशी संध्याकाळी अटक केली. माधवी चारी (वय 20) हिने कुटुंबियांच्या विरोधात जाऊन बी. संदीप (वय 22) बरोबर विवावाह केला. गेल्या पाच वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते. संदीप हा दलित असल्याने मनोहर चारी यांना हा विवाह मान्य नव्हता. या रागातून त्यांनी या नवविवाहित जोडप्यावर हल्ला केला.

माधवी व संदीपने 12 सप्टेंबरला कोणालाही कळू न देता बोलारम येथे विवाह केला होता. बुधवारी दुपारी मनोहर यांनी मुलीला फोन करुन आपल्याला तुमचा विवाहाचा निर्णय मान्य असल्याचे सांगून दोघांना बोलावून घेतले. माधवीने वडीलांवर विश्वास ठेवून संदीपसोबत दुचाकीवरून गोकुळ थिएटर येथे पोहोचले. रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून ते वडीलांची वाट पाहत होते. दुपारी 3.15 च्या सुमारास मनोहर तिथे पोहोचला. जवळ येताच त्याने कोयता बाहेर काढला व संदीपवर वार करायला सुरवात केली. संदीपने स्वत:ची सुटका करुन घेत तिथून पळ काढला. त्यानंतर त्याने कोयत्याने वार करुन माधवीचे हात तोडले. यावेळी माधवी नाना थांबा... नका मारू मला.... असे म्हणून विनवनी करुन हातापाया पडत होती. परंतु, दारूच्या नशेत असलेला मनोहर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मनोहर पुन्हा माधवीवर वार करणार इतक्यात एका व्यक्तीने लाथ मारुन त्याल दूर ढकलले. जमलेला जमाव पाहून मनोहरने तिथून पळ काढला. माधवीची प्रकृती चिंताजणक आहे. संदीप सुद्धा जखमी झाला आहे, त्याला वडिल नसून तो सध्या शिक्षण घेत आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

दरम्यान, हैदराबादमध्ये आठवडाभरात दोन घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

संबंधित बातमीः

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com