शाळेची फी भरण्यास उशीर केला म्हणून 19 विद्यार्थ्यांना कोंडले

वृत्तसंस्था
रविवार, 19 मार्च 2017

येथील एका खाजगी शाळेने 19 विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनी शाळेची फी वेळेत न भरल्याने शाळेत कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर या विद्यार्थ्यांना सोडण्यात आले.

हैदराबाद - येथील एका खाजगी शाळेने 19 विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनी शाळेची फी वेळेत न भरल्याने शाळेत कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर या विद्यार्थ्यांना सोडण्यात आले.

शनिवारी 19 विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेची फी भरली नसल्याचे शाळेच्या व्यवस्थापनाला लक्षात आले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थापनाने वार्षिक परीक्षेला बसू दिले नाही. त्यामध्ये पहिल्या तसेच अर्धा तास शाळेतील एका खोलीत कोंडून ठेवले. वर्गातील विद्यार्थ्यांचाही समावेश होता. याबाबत हयातनगर पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक जे नरेंद्र गौड यांनी माहिती दिली. "पालकांनी शाळेची फी भरण्यास उशीर केल्याचे सांगत शाळेच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना कोंडून ठेवले आणि परिक्षेला बसू दिले नाही. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले आणि त्यांना परिक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली', अशी माहिती गौड यांनी दिली.

एका विद्यार्थ्याच्या पालकाने शाळेच्या व्यवस्थापनाविरूद्ध पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.