मी राजीनामा देण्याचा प्रश्‍नच नाही: अमित शहा

वृत्तसंस्था
सोमवार, 31 जुलै 2017

बिहारमध्ये नितीशकुमार यांना भ्रष्ट नेत्यांबरोबर रहावयाचे नव्हते, म्हणून त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. अशा वेळी आम्ही त्यांना तसेच काम करत रहा, असे सांगणे अपेक्षित होते का?

लखनौ - भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा प्रश्‍नच उद्‌भवित नसल्याचे अमित शहा यांनी आज (सोमवार) स्पष्ट केले.

"अध्यक्षपदाचे काम करताना मी अत्यंत आनंदी आहे. मी माझ्या पूर्ण क्षमतेने काम करत आहे,'' असे शहा म्हणाले. शहा यांनी नुकताच राज्यसभेसाठी अर्ज भरला आहे. राज्यसभेसाठी निवड झाल्यास ते पक्षाध्यक्ष पदाचा राजीनाम देतील, अशी अटकळ बांधण्यात आली होती. मात्र शहा यांनी या शक्‍यतेस ठामपणे पूर्णविराम दिला आहे.

शहा यांनी यावेळी बोलताना भाजपने बिहारमध्ये फोडाफोडीचे राजकारण केल्याचा आरोपही फेटाळून लावला. ""बिहारमध्ये नितीशकुमार यांना भ्रष्ट नेत्यांबरोबर रहावयाचे नव्हते, म्हणून त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. अशा वेळी आम्ही त्यांना तसेच काम करत रहा, असे सांगणे अपेक्षित होते का?,'' असा प्रतिप्रश्‍न त्यांनी या पार्श्‍वभूमीवर विचारला.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा: