सलमान काय चुकीचे बोलला?: आझम खान

वृत्तसंस्था
शनिवार, 1 ऑक्टोबर 2016

‘सलमान काय चुकीचे बोलला?‘ असा प्रश्‍न समाजवादी पक्षाचे नेते आझम यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई - अभिनेता सलमान खानच्या ‘पाकिस्तानी कलाकार हे दहशतवादी नाहीत, तर केवळ कलाकार आहेत‘ या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ‘सलमान काय चुकीचे बोलला?‘ असा प्रश्‍न समाजवादी पक्षाचे नेते आझम यांनी उपस्थित केला आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना आझम खान म्हणाले, ‘मला असे वाटत नाही की सलमान खान काही चुकीचे बोलला किंवा त्याच्या वक्तव्यामुळे आपल्या भावनाही दुखावल्या नाहीत. मला शिवसेनेला सांगावेसे वाटते की त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करावी. सत्तेमध्ये त्यांची भागीदारी आहे. त्यांच्याच सरकारने पाकिस्तानमधील कलाकारांना व्हिसा दिला आहे. मी शिवसेनेच्या नाटकीपणाच्या खोलात शिरु शकत नाहीत. वास्तव असे आहे की, भारत आणि पाकिस्तानला जोडणारी बस सेवा अद्यापही सुरू आहे. दोन्ही देशातील राजदूतांना अद्याप परत बोलाविलेले नाही.‘