तेज बहादूर व पत्नीची अखेर झाली भेट !

वृत्तसंस्था
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली- लष्करातील जवानांना मिळणाऱया अन्नाबाबत सोशल नेटवर्किंगवर व्हिडिओ अपलोड करणारे सीमा सुरक्षा दलाचे जवान तेज बहादूर यादव व आपली भेट झाली असून, ते सुरक्षित आहेत, असे यादव यांच्या पत्नीने उच्च न्यायालयात आज (बुधवार) सांगितले.

जम्मू काश्‍मीरमध्ये नियंत्रण रेषेवर तैनात असताना यादव यांनी व्हिडिओ फेसबुकवर अपलोड करत मिळणाऱ्या अन्नाबाबत तक्रार केली होती. "हा आमचा नाष्टा आहे - एक जळालेला पराठा आणि कपभर चहा. लोणी नाही, जाम नाही आणि लोणचेही नाही. अशा प्रकारचे अन्न खाऊन जवान आपले कर्तव्य बजावू शकतो काय? हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती.

देशभर खळबळ उडाल्यानंतर आपले पती बेपत्ता असल्याची तक्रार पत्नीने केली होती. शिवाय, आपल्या पतीची लष्कराने अज्ञात ठिकाणी बदली केली असून, आपल्याला भेटू दिले जात नसल्याची याचिका न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने लष्कराला भेट घडवून देण्याचे आदेश दिले होते.

न्यायालयात आज झालेल्या सुनावणी झाली. यावेळी यादव यांनी पतीशी भेट झाली असून, ते सुरक्षित असल्याचे न्यायालयात सांगितले.

Web Title: I Met My Husband, BSF Jawan Tej Bahadur Yadav's Wife Tells Court