लालूप्रसादांच्या निवासस्थानी प्राप्तिकर विभागाचे छापे

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 मे 2017

प्राप्तिकर विभागाने लालूप्रसाद यांच्यासह त्यांच्या मुलाच्या दिल्ली, गुरुग्राम यांसह 22 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यांतून प्राप्तिकर विभागाच्या हाती काय लागले आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.

नवी दिल्ली - राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) लालूप्रसाद यादव यांच्यावरील जमीन गैरव्यवहार आरोपां प्रकरणी आज (मंगळवार) सकाळी प्राप्तिकर विभागाकडून 22 ठिकाणी छापे टाकण्यात आले.

लालूप्रसाद यांच्याविरोधात बिहारमधील भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी जमीन गैरव्यवहाराचे आरोप केले होते. मोदी यांनी लालूंवर आरोप करताना 1 हजार कोटी रुपयांचा जमीन गैरव्यवहार केल्याचे म्हटले होते. मात्र, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून लालूप्रसाद यांना क्लिन चीट देण्यात आली होती.

अखेर आज प्राप्तिकर विभागाने लालूप्रसाद यांच्यासह त्यांच्या मुलाच्या दिल्ली, गुरुग्राम यांसह 22 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यांतून प्राप्तिकर विभागाच्या हाती काय लागले आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच लालूप्रसादांना झटका दिला होता. चारा घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर खटला चालविण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर आता प्राप्तिकर विभागाने त्यांच्या निवासस्थानी छापे टाकले आहेत.