Corona 4th Wave: ICMR च्या तज्ज्ञांचे मोठं विधान; म्हणाले, आता अधिक...

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या आकडेवारीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
 Corona
Corona sakal

नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या आकडेवारीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्यांकडून सावध पाउलं उचलली जात आहे. वाढत्या कोरोनाच्या आकडेवारीनंतर अनेकांनी देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेला सुरुवात झाली असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. या सर्व घडामोडींमध्ये ICMR च्या तज्ज्ञांनी मोठं विधान केलं आहे. (ICMR Expert Comment On Corona Fourt Wave)

 Corona
कोरोना वाढतोय, गाफील राहू नका; केंद्राचे राज्यांना पुन्हा पत्र

देशातील काही भागांमध्ये कोरोनाच्या नव्या बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, वाढती रूग्णसंख्या म्हणजे देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेला सुरुवात झाली आहे, असे विधान करणं चुकीचं आहे. चौथ्या लाटेबाबत भाष्य करण्यापूर्वी जिल्हा स्तरावर माहिती एकत्र करून त्याचे पुनरावलोकन करणे आवश्यक आहे, असे मत ICMR चे एडीजी सिमरन पांडा यांनी स्पष्ट केलं. देशभरातील प्रकरणांमध्ये झालेल्या वाढीपेक्षा काही जिल्ह्यांतील प्रकरणांची संख्या एकसमान मानली जाऊ शकत नाही. प्रत्येक व्हेरिएंट हा चिंतेचा प्रकार नसतो असे ते म्हणाले.

 Corona
राज्यात कोरोनाची चौथी लाट? मास्क सक्तीबाबत आदित्य ठाकरे म्हणाले...

तोपर्यंत चौथी लाटेची शक्यता नाही

दरम्यान, जोपर्यंत भारतात कोरोनाचे नवीन व्हेरिएंट सापडत नाहीत, तोपर्यंत देशात कोरोनाची चौथी लाट आली आहे असे मानले जाऊ शकत नाही, असे मत यापूर्वी अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. जोपर्यंत देशात नव्या कोरोना व्हेरिएंटची नोंद होत नाही आणि पूर्वीच्या व्हेरियंटपेक्षा वेगळे गुणधर्म दिसून येत नाही तोपर्यंत भारतात चौथी लाट येण्याची शक्यता नाही असे मत मॅक्स हेल्थकेअरचे संचालक डॉ. रोमेल टिक्कू यांनी गुरुवारी सांगितले.

ते म्हणाले की, लोक वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत आहेत, त्यामुळे देशात कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. कोरोनाच्या आकडेवारीत मोठी वाढ होईल अशी शक्यता आतातरी दिसून येत नाही. शुक्रवारी देशात 7,584 नवे बाधितांची नोंद करण्यात आली तर, 24 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दहा दिवसांपासून देशातील रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com