भाजपने आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला, तर... : मेहबुबा मुफ्ती

Mehbooba Mufti
Mehbooba Mufti

नवी दिल्ली : 'आमचा पक्ष तोडण्याचा प्रयत्न दिल्लीतून होत असेल, तर त्याचे खूप भयानक परिणाम होतील', असा इशारा जम्मू-काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि 'पीडीपी'च्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी दिला. काश्‍मीरमधील वाढत्या हिंसाचाराच्या मुद्यावरून भाजपने गेल्या महिन्यात 'पीडीपी' सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे अल्पमतात आलेल्या मुफ्ती यांनी तातडीने राजीनामा दिला होता. 

'पीडीपी'मधील नाराज आमदारांना हाताशी धरून भाजप जम्मू-काश्‍मीरमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नांत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. 'पीडीपी'चे प्रतिस्पर्धी आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनीही काही दिवसांपूर्वी असेच संकेत दिले होते. त्या पार्श्‍वभूमीवर मुफ्ती यांनी 'एएनआय' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हा इशारा दिला. 

या मुलाखतीत मुफ्ती म्हणाल्या, "1987 प्रमाणे आताही दिल्लीने राज्यातील जनतेचे मत हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि निष्ठा संपविण्याचा प्रयत्न झाला, तर त्याचे परिणाम वाईट होतील. सलाहुद्दीन किंवा यासिन मलिक ज्या वेगाने प्रस्थापित झाले, तीच परिस्थिती पुन्हा निर्माण होईल. दिल्लीने 'पीडीपी' तोडण्याचा प्रयत्न केला, तर होणारे परिणाम भयंकर असतील.'' 

'राज्यात आमदारांचा घोडेबाजार होत आहे. हे टाळण्यासाठी विधानसभा तातडीने विसर्जित केली पाहिजे', अशी मागणी अब्दुल्ला यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. भाजपचे प्रभारी राम माधव यांनी हे सर्व आरोप फेटाळले होते. तसेच, जम्मू-काश्‍मीरमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याच्या वृत्तात तथ्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com