'कुलभूषण यांना सोडले नाही तर पाकिस्तानचे 16 तुकडे'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

नवी दिल्ली- भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी व पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेले कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने सोडले नाही तर त्यांचे 16 तुकडे करायला हवेत, असे भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

एका कार्यक्रमादरम्यान बोलताना स्वामी म्हणाले, 'पाकिस्तानचे आताच दोन तुकडे झाले आहेत. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली तर चार तुकडे होतील. पाकिस्तानने त्यानंतरही आपली चूक मान्य केली नाही तर 16 तुकडे करायला हवेत.'

'राम मंदिर उभारण्याबाबत फक्त सर्वोच्च न्यायालयाकडून येणाऱया निकालाची वाट पहात आहोत. या वर्षी आम्ही राम मंदिर उभारणूच दाखवू. राम मंदिर उभारण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही,' असेही स्वामी म्हणाले.