मोदींची आरती केली नाहीत तर... : केजरीवाल

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आरती केली नाहीत तर तुमची वाहिनी बंद पडू शकते, असा इशारा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दुरचित्रवाणी वाहिन्यांना दिला आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आरती केली नाहीत तर तुमची वाहिनी बंद पडू शकते, असा इशारा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दुरचित्रवाणी वाहिन्यांना दिला आहे.

पठाणकोटवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे वृत्तांकन करताना एका वृत्तवाहिनीने नियमाचे भंग केल्याप्रकरणी सरकार ही वाहिनी 9 नोव्हेंबर रोजी बंद ठेवणार आहे. या घटनेचा संदर्भ देत केजरीवाल यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. ट्‌विटरद्वारे त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, "चॅनलवाल्यांनो ऐका. जर तुम्ही मोदीजींची आरती केली नाहीत तर तुमचे चॅनल बंद होऊ शकते.' अन्य एका ट्विटमध्ये केजरीवाल यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग हरविले असल्याचे म्हटले आहे.

पठाणकोट हल्ला झाला त्यावेळी हल्ल्याबाबतचे वृत्तांकन करताना संबंधित वृत्तवाहिनीने महत्त्वाची माहिती प्रसारित केली होती. या प्रकारामुळे केवळ राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोचू शकला नसता तर देशातील नागरिक आणि सुरक्षा अधिकाऱ्यांच्या जीविताला मोठा धोका निर्माण पोचू शकला असता' असे कारण देत संबंधित वृत्तवाहिनी सरकार एक दिवस बंद ठेवणार आहे. जी माहिती यापूर्वीच छापील, इलेक्‍ट्रॉनिक आणि सोशल मिडियाद्वारे लोकांपर्यंत पोचली होती तीच माहिती प्रसारित केल्याचा दावा संबंधित वृत्तवाहिनीने केला आहे.

देश

मुझफ्फरपूर: पत्रकार राजदेव रंजन यांची हत्या व गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार महंमद...

11.33 PM

अहमदाबाद: गुजरातमधील दहशतवाद प्रतिबंध पथकाने (एटीएस) बनावट पासपोर्ट रॅकेटचा भांडाफोड केला आहे. गुजरात व मुंबईमध्ये हे बनावट...

10.33 PM

पणजी (गोवा): मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या विधानसभा पोट निवडणुकीत उद्या...

07.18 PM