बेहिशेबी नोटाप्रकरणी कंत्राटदाराला अटक

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मार्च 2017

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या चेन्नई शाखेने सोमवारी रात्री उशिरा बांधकाम विभागाचे कंत्राटदार सिकर रेड्डी याला ताब्यात घेतले आहे.

नवी दिल्ली - बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या चेन्नई शाखेने सोमवारी रात्री उशिरा बांधकाम विभागाचे कंत्राटदार सिकर रेड्डी याला ताब्यात घेतले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये नोटाबंदीबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर 130 कोटी रुपयांच्या बेहिशेबी नोटा बदलण्यासाठी नेताना रेड्डी सापडला होता. त्यावेळी केंद्रीय अन्वेषण शाखेने त्याला ताब्यात घेतले होते. काही दिवसांपूर्वीच त्याची जामीनावर मुक्तता झाला होती. दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने त्याला सोमवारी रात्री ताब्यात घेतले. त्यानंतर तब्बल अकरा तासांच्या चौकशीनंतर त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

तमिळनाडूचे माजी मुख्य सचिव टी. एन. राव आणि त्यांचा पुत्र विवेक पपीसेट्टी यांच्यावर छापे टाकल्यानंतर रेड्डीला ताब्यात घेण्यात आले आहे. राव आणि पपीसेट्टी यांच्या चौकशी करणाऱ्या प्रप्तिकर विभागाच्या समितीतील एका अधिकाऱ्याने बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी या दोघांचीही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे.