'आयकर'ची मोठी कारवाई; देशभरातील दारू व्यावसायिकांच्या 400 ठिकाणांवर छापे

Income Tax Department
Income Tax Departmentesakal
Summary

आयकर विभागानं देशभरातील दारू व्यावसायिकांवर मोठी कारवाई केलीय.

नवी दिल्ली : आयकर विभागानं (Income Tax Department) देशभरातील दारू व्यावसायिकांवर (liquor Barons) मोठी कारवाई केलीय. आयकर विभागानं मद्यविक्रेत्यांच्या 400 ठिकाणी छापे टाकले आहेत. एजन्सीच्या सूत्रांनी सांगितलं की, प्राप्तिकर विभागानं बुधवारी देशभरातील दारू व्यापाऱ्यांसह विविध गटांच्या सुमारे 400 ठिकाणी शोध मोहीम सुरू केलीय.

हरियाणातील गुरुग्राम, मुंबई (Mumbai), दिल्लीसह पाच राज्यांमध्ये आयकर पथकं शोध मोहीम राबवत आहेत. बुधवारी सकाळी आयटी पथक वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील दूतावास समूह कार्यालयात पोहोचलं. यादरम्यान कोणालाही कार्यालयातून बाहेर पडू दिलं नाही.

Income Tax Department
माजी पंतप्रधानांनी राज्यसभा निवडणुकीसाठी सोनिया गांधींकडं मागितला पाठिंबा

याशिवाय, गुरुग्राममध्ये दारूचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाच्या कार्यालयावरही छापे टाकण्यात आले. या व्यावसायिकांचा करचुकवेगिरीत सहभाग असण्याची शक्यता आयकर विभागाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com