प्राप्तीकर विभागाच्या छाप्यात 24 कोटींच्या नव्या नोटा जप्त

वृत्तसंस्था
शनिवार, 10 डिसेंबर 2016

वेल्लूर (तमिळनाडू) - प्राप्तीकर विभागाने केलेल्या कारवाईत एका मोटारीत 24 कोटी रुपयांच्या नव्या नोटा सापडल्या आहेत. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.

प्राप्तीकर विभागाने आज केलेल्या कारवाईत एका मोटारीत प्रत्येकी दोन कोटी रुपये असलेले 12 बॉक्‍स आढळून आले आहेत. ज्या मोटारीत ही रक्कम आढळून आली आहे ती मोटार सीकर रेड्डी नावाच्या एका व्यावसायिकाची आहे. गेल्या दोन दिवसात प्राप्तीकर विभागाने चेन्नईतील आठ ठिकाणी छापे टाकले होते. त्यामध्ये तीन व्यावसायिकांचा समावेश होता. सीकर रेड्डी त्यापैकीच एक व्यावसायिक आहे.

आज सापडलेल्या नव्या चलनातील नोटांची रक्कम ही पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घोषित केल्यानंतर केलेल्या कारवाईतील सर्वात मोठी रक्कम असल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसात प्राप्तीकर विभागाने चेन्नईतील वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यामध्ये सोने आणि रोख रकमेसह आतापर्यंत 142 कोटी रुपयांची अघोषित संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

देश

समाजसुधारक व मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांनी ५० वर्षांपूर्वी सुरू केलेल्या मुस्लिम महिलांच्या घटनात्मक...

03.30 AM

सर्वोच्च न्यायालयालाने तोंडी तलाक हा घटनाबाह्य असल्याचा दिलेला निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण असून, फतवे काढणाऱ्या मौलवी, हुरियत...

02.33 AM

जो कुरआन में नहीं है, उसे कानून कैसे कहा जा सकता है...सर्वोच्च न्यालयाचे न्यायाधीश कुरियन यांनी निकाल देताना हे मत व्यक्‍त केले....

01.33 AM