कर्करुग्णांच्या संख्येत वाढ; केंद्राची लोकसभेत माहिती

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - देशात कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती आज केंद्र सरकारने लोकसभेत दिली. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) केलेल्या पाहणीनुसार सध्या देशात चौदा लाख नागरिक या रोगाने ग्रस्त असल्याची बाब समोर आली आहे.

नवी दिल्ली - देशात कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती आज केंद्र सरकारने लोकसभेत दिली. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) केलेल्या पाहणीनुसार सध्या देशात चौदा लाख नागरिक या रोगाने ग्रस्त असल्याची बाब समोर आली आहे.

आयसीएमआरच्या माहितीनुसार 2013 मध्ये देशात 12 लाख 70 हजार 781 रुग्ण या रोगाने ग्रस्त होते. त्यात वाढ होऊन चालू वर्षात ही संख्या 14 लाख 51 हजार 417 च्या घरात गेल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांनी लोकसभेत दिली. देशात सध्या 20 इन्स्टिट्यूट व 50 आरोग्य केंद्रांमध्ये या रोगावर सवलतीच्या दरात; तसेच मोफत उपचार घेता येतात. त्यांची संख्या वाढविणे व ही केंद्रे आणखी कार्यक्षम करण्याचे काम यासंबंधित योजनेअंतर्गत सुरू असल्याचेही कुलस्ते यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान नमूद केले.

बिजू जनता दलाचे खासदार बालभद्र माझी यांनी या समस्येबाबत प्रश्न उपस्थित करत ओडिशामध्ये मोफत उपचार केंद्रे स्थापन करण्याची मागणी केली. यावर राज्याने तसा प्रस्ताव दिल्यास त्यावर निश्‍चित मार्ग काढला जाईल, असे कुलस्ते यांनी स्पष्ट केले.

देश

कोलकता: संपूर्ण दार्जिलिंगमध्ये वेगळ्या गोरखालॅंडसाठी चळवळ उभी करणारा गोरखा जनमुक्ती मोर्चाचा नेता बिमल गुरुंग याला आपल्या हातून...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

ऑक्‍सिजनचा अपुरा पुरवठा; एक कर्मचारी निलंबित रायपूर: छत्तीसगडच्या सर्वांत मोठ्या रायपूर येथील एका सरकारी रुग्णालयात कथित ऑक्‍...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

पणजी : पुणे राष्ट्रीय हरित लवादाकडील गोव्यातील दावे दिल्ली लवादाकडे हलविण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017