कतारमध्ये अडकलेल्या भारतीयांना "एअर लिफ्ट'

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 जून 2017

कतारमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी सुरक्षित आणण्यासाठी सर्व उपाययोजना तत्काळ करण्यात येईल, असे राजु यांनी स्वराज यांना आश्‍वस्त केले आहे

नवी दिल्ली - पश्‍चिम आशियामधील महत्त्वपूर्ण देश असलेल्या कतारवर सौदी अरेबियासहित इतर अनेक देशांनी निर्बंध लादल्यामुळे येथे असलेल्या भारतीय नागरिकांसाठी अडचणीची परिस्थिती उद्‌भविली आहे. कतारमधील भारतीय नागरिकांना सुरक्षित भारतामध्ये परत आणण्यासाठी सरकारतर्फे 25 जून ते 8 जुलै पर्यंत दोहा ते केरळ अशी विशेष हवाई प्रवास सुविधा पुरविण्यात येणार आहे. यासाठी 186 प्रवासी बसण्याची क्षमता असलेले बोईंग 737 वापरण्यात येणार आहे. याशिवाय जेट एअरवेज कंपनीतर्फे गुरुवारी व शुक्रवारी दोहा ते मुंबई या प्रवासासाठी जास्तीची विमानेही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री ए जी राजु यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली आहे. कतारमधून भारतात येण्याची इच्छा असलेल्या भारतीयांना परत मायदेशी आणण्यासाठी या हवाई मार्गावरील विमानांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. कतारमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी सुरक्षित आणण्यासाठी सर्व उपाययोजना तत्काळ करण्यात येईल, असे राजु यांनी स्वराज यांना आश्‍वस्त केले आहे.

कतारवर निर्बंध लादण्यात आल्यामुळे येथे जीवनावश्‍यक वस्तुंचा तुटवडा जाणवू लागला आहे. कतारमध्ये असलेल्या भारतीयांची यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे. कतारमध्ये सध्या सुमारे 7 लाख भारतीय आहेत. या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

देश

चंडीगड: डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याला शिक्षा सुनावल्यानंतर हरियानात हिंसाचार घडवून आणल्याप्रकरणी हनीप्रीत इन्सानविरुद्ध...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

हैदराबाद: वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम (एमबीबीएस) प्रवेशास पात्र न ठरल्याने पतीने पत्नीला जाळल्याची घटना येथे नुकतीच घडली. याप्रकरणी...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

देवरिया (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील देवरिया शहरात पंधरा वर्षे वयाच्या विद्यार्थीनीचा शाळेच्या तिसऱया मजल्यावरून पडून मृत्यू...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017