गेली काही वर्षे भारत-बांगलादेश संबंधातील सुवर्ण अध्याय: मोदी

वृत्तसंस्था
शनिवार, 26 मे 2018

शांतिनिकेतन: गेली काही वर्ष ही भारत-बांगलादेशमधील मैत्रीपूर्ण संबंधातील सुवर्ण अध्याय असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. या काळात जमीन आणि सागरी सीमेसारख्या क्‍लिष्ट समस्या मार्गी लागल्याचेही त्यांनी नमूद केले.

विश्व भारती विद्यापीठात बांगलादेश भवनचे उद्‌घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या वेळी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना याही उपस्थित होत्या. मोदी यांनी बंगाली भाषेत त्यांचे स्वागत केले. मोदी म्हणाले, भारत-बांगलादेशमधील मान्यवरांनी दिलेल्या सांस्कृतिक योगदानाची माहिती उभय देशातील तरुणांना व्हावी, यासाठी केंद्र सरकार पुढाकार घेईल. रस्ते असो, रेल्वे असो किंवा आंतरराष्ट्रीय जलमार्ग दोन्ही देश कनेक्‍टिव्हिटीच्या क्षेत्रात वेगाने पुढे जात आहेत. एकेकाळी अशक्‍यप्राय ठरलेले सीमेसारखे प्रश्न अखेर धसास लागले असून, भारत-बांगलादेशने आपल्या मैत्रीचा सुवर्ण अध्याय लिहला आहे, असेही मोदी म्हणाले.

रवींद्रनाथ टागोर यांच्या गाण्यांमुळे दोन्ही देशातील संबंधांमधील गोडवा वाढला असून, ज्याप्रमाणे आम्ही बांगलादेश भवनचे पश्‍चिम बंगालमध्ये उद्‌घाटन केले. त्याप्रमाणे रवींद्रनाथ टागोर यांच्या निवासस्थानाचे नूतनीकरण करण्याची जबाबदारीही आम्ही स्वीकारली असल्याचे मोदी यांनी या वेळी सांगितले.

Web Title: india bangladesh relation and narendra modi