हवाई क्षेत्रात भारत तिसऱ्या स्थानी पोचेल

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जानेवारी 2017

हवाई वाहतूक क्षेत्र केवळ आता लोकप्रियच नव्हे, तर आवश्‍यक बनले आहे. विमान प्रवासाचे भाडे आणि वातानुकूलित रेल्वेचे भाडे समान पातळीवर आले आहे.
- आर. एन. चौबे, सचिव, नागरी हवाई वाहतूक विभाग

विजयवाडा : भारतात विमानतळांच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पुढील पाच वर्षांमध्ये 10 अब्ज डॉलर खर्च करण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक सचिव आर. एन. चौबे यांनी गुरुवारी दिली. भारत पुढील सात वर्षांत हवाई क्षेत्रातील जगातील तिसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ बनेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

भारतीय हवाई परिषदेत बोलताना चौबे म्हणाले, ""देशात सुमारे चारशे धावपट्ट्या रिकाम्या पडून असून, त्या गुरे चारण्याच्या जागा बनल्या आहेत. त्या पुन्हा वापरात आणण्यात येणार आहेत. देशातील हवाई क्षेत्राच्या वाढीचा दर 23 टक्‍क्‍यांवर नेण्याचा सरकारचा विचार आहे. यासाठी पुढील पाच वर्षांत विमानतळांच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी 10 अब्ज डॉलर खर्च करण्यात येणार आहेत. पुढील सात वर्षांत भारतीय हवाई क्षेत्र जगात तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. भारताचा प्रतिस्पर्धी चीनमधील हवाई क्षेत्रातील वाढ 14 टक्के आहे.''

"जास्तीत जास्त नागरिकांना हवाई मार्गाने प्रवास करता यावा, हे सरकारचे धोरण आहे. यामुळेच सरकारने प्रादेशिक हवाई मार्ग जोडणी योजना सुरू केली आहे. रेल्वेची उलाढाल 1.6 लाख कोटी रुपये असून, हवाई वाहतूक क्षेत्राची उलाढाल 1.4 लाख कोटींपर्यंत पोचली आहे. रेल्वे आणि हवाई प्रवासीसंख्याही समान पातळीवर आली आहे,'' असे चौबे यांनी सांगितले.

हवाई वाहतूक क्षेत्र केवळ आता लोकप्रियच नव्हे, तर आवश्‍यक बनले आहे. विमान प्रवासाचे भाडे आणि वातानुकूलित रेल्वेचे भाडे समान पातळीवर आले आहे.
- आर. एन. चौबे, सचिव, नागरी हवाई वाहतूक विभाग

देश

भाजप- काँग्रेसमध्ये भडकले वाक्‌युद्ध गोरखपूर: काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज गोरखपूरला भेट दिली. येथील...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

भोपाळ: भारतीय जनता पक्ष केवळ पाच-दहा वर्षे नव्हे तर, किमान 50 वर्षांसाठी सत्तेत आला आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाला आणखी मजबूत करत...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) औपचारिक सहभागी झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू)...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017