अडवानी, जोशींसह उमा भारतींना दिलासा

यूएनआय
गुरुवार, 8 जून 2017

लखनौ - भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांना अयोध्या प्रकरणात आज मोठा दिलासा मिळाला. वादग्रस्त वास्तू पाडण्यात आल्याप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने तिन्ही नेत्यांना दररोज उपस्थित राहण्यापासून सूट दिली.

अडवानी आणि जोशी यांचे वय, तर उमा भारती यांच्याकडे केंद्रीय मंत्रिपदाची असलेली जबाबदारी लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांना दररोज सुनावणी उपस्थित न राहण्याची परवानगी दिली. मात्र, तिन्ही नेत्यांच्या वकिलांनी कोणत्याही परिस्थितीत सुनावणीला उपस्थित राहिले पाहिजे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचवेळी अन्य नऊ आरोपींना वैयक्तिकरीत्या सुनावणी उपस्थित राहण्यापासून सवलत देण्यास न्यायालयाने नकार दिला. अन्य आरोपींमध्ये भाजपचे नेते विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, विष्णू हरि डालमिया, रामविलास वेदांती, महंत नृत्यगोपाल दास, महंत ज्ञानदास, विहिंप नेता चंपत राय तसेच वैकुंठलाल शर्मा यांचा समावेश आहे.