'त्या' पत्रकाराचा मोदींना प्रश्‍न 'तुम्ही ट्‌विटरवर आहात का?'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 जून 2017

नवी दिल्ली : फेसबुक, ट्‌विटवरसह सोशल मिडिया साईटसवर अत्यंत सक्रिय असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्रकाराने 'तुम्ही ट्‌विटरवर आहात का?' असा प्रश्‍न विचारला आहे. हा प्रश्‍न विचारणाऱ्या अमेरिकेतील मॅजिन केली या महिला पत्रकाराला ट्‌विटरवर मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले आहे.

एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेण्यापूर्वी त्या व्यक्तीबद्दलची प्राथमिक माहिती घेणे अत्यंत महत्वाचे असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मिडियावर अत्यंत सक्रिय असतात. सोशल मिडियाचा त्यांनी प्रशासनात अत्यंत प्रभावी वापर केल्याचे दिसून आले आहे. मात्र मॅजिन केलीने त्यांना 'तुम्ही ट्‌विटरवर आहात का?' असा प्रश्‍न विचारला. मोदी आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची केली हीने रशियातील सेंटर पिटर्सबर्ग येथे एकाच वेळी मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान मोदी यांनी केली हिने ट्‌विटरवर पोस्ट केलेल्या छत्रीसोबतच्या छायाचित्राचे कौतुक केले. या कौतुकानंतर केलीने 'तुम्ही ट्‌विटरवर आहात का?' असा प्रश्‍न विचारला. या प्रश्‍नावर मोदी यांनी हास्य केले. या प्रश्‍नामुळे केलीला मोठ्या टिकेला सामोरे जावे लागले असून मुलाखतीपूर्वी तयारी करून जाण्याचा सल्ला नेटिझन्सननी तिला दिला आहे.