अल्पवयीन मुलीवर बलात्कार; गर्भवती राहिल्याने समोर आला प्रकार!

वृत्तसंस्था
बुधवार, 31 मे 2017

मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) : एका सोळा वर्षाच्या मुलीवर दोन नराधमांनी अनेकदा बलात्कार करून तक्रार न करण्याची धमकी दिली. मात्र मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला असून या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदविली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीच्या पालकांना मुलगी तीन महिन्याची गर्भवती राहिल्याचे लक्षात आल्याने हा प्रकार समोर आला. पीडित मुलीच्या वडिलांनी कोतवाली पोलिसांकडे तक्रार केली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून आरोपी मुलीवर बलात्कार करत असल्याचे वडिलांनी सांगितले आहे. दोन्ही आरोपी फरार आहेत. या प्रकरणाचा तपस सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.