'अग्नि-5' ची भारताने केली यशस्वीपणे चाचणी

वृत्तसंस्था
रविवार, 3 जून 2018

'अग्नि-5' या आण्विक क्षमतेच्या क्षेपणास्त्राची ओडिशा येथे यशस्वी चाचणी घेण्यात आली. पाच हजार किमी पल्ला असलेल्या या क्षेपणास्त्राची येथील अब्दुल कलाम बेटावरुन सकाळी 9.50 ला चाचणी घेण्यात आली.

नवी दिल्ली : 'अग्नि-5' या क्षेपणास्त्राची भारताने आज (रविवार) चाचणी घेतली. भारताने घेतलेल्या ही चाचणी यशस्वीपणे पार पडली. ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील अब्दुल कलाम बेटाजवळ ही चाचणी घेण्यात आली. क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी सहाव्यांदा पूर्ण झाली. यापूर्वी 18 जानेवारीमध्ये ही चाचणी घेण्यात आली.

'अग्नि-5' या आण्विक क्षमतेच्या क्षेपणास्त्राची ओडिशा येथे यशस्वी चाचणी घेण्यात आली. पाच हजार किमी पल्ला असलेल्या या क्षेपणास्त्राची येथील अब्दुल कलाम बेटावरुन सकाळी 9.50 ला चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून चीनच्या काही भागात पोचण्याची क्षमता यामध्ये असणार आहे. अग्नि हे भारताच्या महत्त्वाकांक्षी क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमामधील अत्यंत महत्त्वाचे क्षेपणास्त्र मानले जाते.

Web Title: India successfully test fire Agni 5