राजीव गांधींच्या काळात हायड्रोजन बॉम्बची निर्मिती 

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 जानेवारी 2017

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या अणू कार्यक्रमाला प्रत्युत्तर म्हणून भारताने तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली 1985 मध्ये हायड्रोजन बॉम्बची एक चाचणी करण्याची सर्व तयारी होती, असे अमेरिकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या काही कागदपत्रांतून समोर आले आहे. 
 
अमेरिकेची गुप्तचर संस्था सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीने (CIA) याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. दक्षिण आशियामध्ये 1985 च्या दरम्यान आण्विक शस्त्रात्र स्पर्धा वाढण्याची शक्यता पाहून भारत-पाक यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी एक प्रतिनिधी पाठवण्याचा विचार अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रिगन करीत होते.  

सुमारे 9 लाख 30 हजार गोपनीय कागदपत्रे प्रसिद्ध करून सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीद्वारे (CIA) याबाबतची माहिती उघड केली आहे. संबंधित कागदपत्रांपैकी तब्बल 1 कोटी 20 लाखांहून अधिक पाने ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यातून भारताची 1980च्या दशकामधील आण्विक क्षमता, तसेच पाकच्या अणू कार्यक्रमाबद्दलची भारताची चिंता स्पष्ट होते. 
भारताची अत्यंत कडक सुरक्षा असल्याने भारताच्या अणू कार्यक्रमाबाबत माहिती मिळवणे जिकिरीचे झाले होते, असे CIAच्या एका दस्तऐवजात म्हटले आहे.  
 
राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकार तेव्हा आण्विक तंत्रज्ञानामध्ये पाकिस्तानच्या खूप पुढे होते. 1974च्या दरम्यान इंदिरा गांधी यांच्या कार्यकालात चाचणी केलेल्या हायड्रोजन बॉम्बपेक्षा राजीव यांच्या काळातील नियोजित हायड्रोजन बॉम्ब अधिक शक्तिशाली होता. अणू कार्यक्रम पुढे नेण्यास राजीव गांधी फारसे उत्सुक नव्हते, मात्र पाकिस्तान आण्विक शस्त्रात्रे बनवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असल्याने भारताला आपल्या अणू कार्यक्रमाचा पुन्हा आढावा घेणे भाग पडले.

भाभा आण्विक संशोधन केंद्रातील 36 शास्त्रज्ञांच्या गटाने त्या हायड्रोजन बॉम्बची निर्मिती केली होती.