पीओकेमधील 12 वर्षीय मुलाला राजौरीत अटक

वृत्तसंस्था
शनिवार, 6 मे 2017

राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमधून हा मुलगा भारतीय हद्दीत आला होता. दहशतवाद्यांनी घुसखोरीचा नवा मार्ग शोधण्यासाठी या मुलाला पाठविले आहे का, याचा शोध भारतीय जवानांकडून घेण्यात येत आहे.

श्रीनगर - प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून भारतीय हद्दीत आलेल्या पाक व्याप्त काश्मीरमधील 12 वर्षीय मुलाला भारतीय जवानांनी अटक केली.

काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात शुक्रवारी रात्री या मुलाला अटक करण्यात आली आहे. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमधून हा मुलगा भारतीय हद्दीत आला होता. दहशतवाद्यांनी घुसखोरीचा नवा मार्ग शोधण्यासाठी या मुलाला पाठविले आहे का, याचा शोध भारतीय जवानांकडून घेण्यात येत आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, एलओसीवर भारतीय जवाने गस्तीवर असताना त्यांना हा 12 वर्षांचा मुलगा भारतीय हद्दीत आढळून आला. तो पाक व्याप्त काश्मीरमधील असून, नौशेरा सेक्टरमधून तो भारतीय हद्दीत आला. अश्फाक अली चौहान असे या मुलाचे नाव असून, तो पीओकेमधील डुंगर पेल गावातील एका निवृत्त जवानाचा मुलगा आहे. संशयास्पदरित्या तो सीमेवर आढळून आल्याने जवानांनी त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले.

Web Title: Indian Army arrests 12-year-old PoK boy along LoC in Rajouri