भारतीय IT कंपन्यांनी एच1बी व्हिसाचा वापर थांबवावा : नारायण मूर्ती

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली : अमेरिकेच्या संसदेत एच1बी व्हिसाबाबत बोलताना इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी भारतातील माहिती तंत्रज्ञान (आयटी)  क्षेत्रातील कंपन्यांनी भारतातील कर्मचाऱ्यांना व्हिसावर अमेरिकेत पाठविण्यापेक्षा अमेरिकेतील स्थानिकांना नोकरीवर ठेवावे, असे आवाहन केले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने पाश्‍चिमात्य देशातून येऊन अमेरिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निर्बंध आणले आहेत. या पार्श्‍वभूमीवर मूर्ती बोलत होते. ते म्हणाले, " भारतातील आयटी कंपन्यांनी अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमध्ये स्थानिक कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवावे. असे केल्यानंतरच खऱ्या अर्थाने कंपनी बहुराष्ट्रीय होऊ शकेल. आपण एच1बी व्हिसाचा वापर थांबवून या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात जात असलेल्या भारतीयांना रोखायला हवे.'

अमेरिकी संसदेत स्थलांतर विधेयक मांडल्यानंतर भारतीय आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. एच1-बी व्हिसाधारकांचे वेतन दुप्पट करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. एच1-बी व्हिसा विधेयकानुसार एच1-बी व्हिसाधारकांचे वार्षिक वेतन एक लाख तीस हजार डॉलर करावे लागणार आहे. जे सध्या 60,000 अमेरिकी डॉलर आहे. या निर्णयाचा भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.