ब्रिटीश महिलेच्या विनयभंगप्रकरणी भारतीयाला कैद

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

दुबई- एका पस्तीस वर्षीय ब्रिटीश महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भारतीय नागरिकाला तीन महिन्यांची कारागृहाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी आज (गुरुवार) दिली.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'एका तेवसी वर्षाच्या मुलाने पस्तीस वर्षीय महिलेचा विनयभंग केला होता. या घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने पती घरी आल्यानंतर तक्रार दाखल केली होती. सुनावणीदरम्यान न्यायालयाने भारतीयाला तीन महिन्यांची शिक्षा सुनावली.'

'एक व्यक्ती पाकिट घेऊन माझ्या घरी आला होता. घराच्या आवारात असताना पाकिट घेऊन त्याला पैसे दिले. त्यावेळी त्याने माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडे तक्रार करेल असे म्हटल्यानंतर त्याने मला सोडून पळ काढला. पती घरी आल्यानंतर पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली होती,' असे पीडीत महिलेने सांगितले.

टॅग्स