एव्हरेस्ट सर केल्यानंतर भारताचा गिर्यारोहक बेपत्ता

वृत्तसंस्था
सोमवार, 22 मे 2017

उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथील गिर्यारोहक रवी कुमार यांनी एव्हरेस्ट सर केल्यानंतर उतरत असताना बेपत्ता झाले आहेत. बाल्कनी एरिया या शेवटच्या विश्रांतीच्या ठिकाणाहून त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही.

काठमांडू - जगातील सर्वांत उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर भारतीय गिर्यारोहक बेपत्ता असल्याचे, नेपाळमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथील गिर्यारोहक रवी कुमार यांनी एव्हरेस्ट सर केल्यानंतर उतरत असताना बेपत्ता झाले आहेत. बाल्कनी एरिया या शेवटच्या विश्रांतीच्या ठिकाणाहून त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही.

अरुण ट्रेक्स या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक चेवांग शेर्पा यांनी सांगितले, की कुमार यांनी रविवारी दुपारी दीडच्या सुमारास यशस्वीरित्या 8,848 मीटर उंचीच्या एव्हरेस्ट शिखर सर केले होते. त्यांचे मार्गदर्शक लाकपा वोंग्या शेर्पा हेही कँप 4 येथे अस्वस्थ अवस्थेत आढळून आले आहेत. कुमार हे दोघे जण वेगळे कसे झाले याचा शोध घेण्यात येत आहे. कुमार यांचा शोध घेण्यात येत आहे.