'भारतीय मुस्लिम राममंदिराविरूद्ध नाहीत पण... '

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मार्च 2017

नवी दिल्ली - अयोध्येत रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीच्या वादावर न्यायालयाने दिलेल्या सूचनेचा आम्ही आदर करतो. भारतीय मुस्लिम राममंदिराविरूद्ध नाहीत. पण, सर्वोच्च न्यायालयानेच अंतिम निर्णय द्यावा, अशा प्रतिक्रिया मुस्लिम धर्मगुरू मौलाना खालीद रशीद फिरंगी महाली यांनी व्यक्त केल्या आहेत.

अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीच्या वादावर न्यायालयाबाहेर मैत्रीपूर्ण तोडगा काढला पाहिजे. त्यामध्ये लोकांच्या भावनांचे मुद्दे आहेत. दोन्ही पक्ष चर्चेला तयार असतील, तर मी स्वच्छेने मदत करायला तयार आहे, असे सांगत सर्वाच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांनी हा वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर बोलताना मौलाना म्हणाले, "भारतीय मुस्लिम राममंदिराच्या विरुद्ध नाहीत. हा संवेदनशील मुद्दा आहे. यापूर्वी आम्ही तडजोडीसाठी एकत्र आलो होतो. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे काहीही मार्ग निघू शकला नाही. त्यामुळे न्यायालयानेच अंतिम निर्णय द्यावा.'

न्यायालयाच्या सूचनेवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. त्यापैकी काही निवडक प्रतिक्रिया

चर्चेने मुद्दा सुटला नाही, तेव्हाच हे प्रकरण न्यायालयात गेले होते.
- सिताराम येच्युरी, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते

यापूर्वी केलेल्या तडजोडी अपयशी ठरल्या. न्यायालयाबाहेर हा मुद्दा सोडविणे शक्‍य नाही.
- झाफरयाब जिलानी, समन्वयक, बाबरी मशिद कृती समिती

सर्वोच्च न्यायालयाचे पाऊल स्वागतार्ह आहे. माझा विश्‍वास आहे की हे प्रकरण न्यायालयाबाहेर सोडविले जाईल.
- उमा भारती, केंद्रीय मंत्री

सर्व भारतीयांच्या सहभागानेच भव्य राममंदिर उभारता येईल.
- दत्तात्रय होसबाळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे