...म्हणून 'इंडिगो'चे तिकिट महागले

वृत्तसंस्था
बुधवार, 30 मे 2018

विमानाच्या इंधनाचे दर वाढले आहेत. त्यामुळे हा भार कमी करण्यासाठी इंडिगोच्या विमान तिकिटावर 400 रुपयांचा अतिरिक्त भार आकारण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांमुळे देशांतर्गत विमानाच्या तिकिटाच्या दरात वाढ करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहे. पेट्रोलचे वाढलेले दर आणि विमान तिकिटाचे दर यामध्ये समतोल साधण्यासाठी इंडिगो विमानाच्या प्रत्येक तिकिटावर 400 रुपयांचा अतिरिक्त भार (सरचार्ज) आकारण्यात येणार असल्याची घोषणा 'इंडिगो'ने केली आहे.

विमानाच्या इंधनाचे दर वाढले आहेत. त्यामुळे हा भार कमी करण्यासाठी इंडिगोच्या विमान तिकिटावर 400 रुपयांचा अतिरिक्त भार आकारण्यात येणार आहे. हे नवे दर 30 मेपासून लागू करण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. वाढलेल्या दराचा भार प्रवाशांकडून वसूल करणारी इंडिगो ही देशांतर्गत पहिली विमान कंपनी आहे. इंडिगोने तिकिटाच्या दरात 400 रुपयांत वाढ केल्याने अन्य काही विमान कंपन्या आपल्या विमान तिकिटाच्या दरात वाढ करण्याची शक्यता आहे.  

Web Title: Indigo Increases Ticket Prices By 400 Rupees As Atf Soars To A New High

टॅग्स