रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 145 वर

पीटीआय
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

कानपूर - कानपूरमध्ये इंदौर-पाटणा एक्‍स्प्रेसच्या अपघातातील मृतांची संख्या आज 145 वर पोचली. 126 मृतदेहांची ओळख पटली असून, 105 जणांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. मृतांमध्ये सर्वांत जास्त 65 प्रवासी उत्तर प्रदेशातील असून, 28 प्रवासी मध्य प्रदेशातील आहेत. याशिवाय बिहारचे 24, महाराष्ट्राचे 2 आणि झारखंडचा 1 प्रवाशांचा मृतांत समावेश आहे.

शवविच्छेदनाच्या अहवालानुसार मृतांत 95 पुरुष, 45 महिला, दोन मुले आणि दोन मुलींचा समावेश आहे. रविवारी झालेल्या भीषण अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. रुळ तुटल्यामुळेच अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक जावेद अहमद यांनी सांगितले, की आतापर्यंत 126 मृतदेहांची ओळख पटली असून, त्यातील 110 मृतदेह नातेवाइकांना सोपविण्यात आले आहे. दुर्घटनेनंतर आता लोहमार्ग सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. अद्यापही काही प्रवासी ढिगाऱ्याखाली दबलेले असावेत, अशी भीती एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या रेल्वे अपघातामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. अजूनही काही प्रवासी बेपत्ता आहेत. दवाखान्यात दाखल असलेले प्रवासी आपल्या नातेवाइकांच्या शोधात आहेत.

रुळ तुटल्याने दुर्घटना
रेल्वे अपघाताची चौकशी सुरू केली असून, प्राथमिक अंदाजानुसार रेल्वे रुळ तुटल्यानेच दुर्घटना झाली असावी, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. थंडीमध्ये रुळ तुटण्याच्या घटना वारंवार घडत असतात. त्यामुळे रेल्वे जाण्यापूर्वी लोहमार्गाची तपासणी केली जाते. चौकशीत दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.

देश

नवी दिल्ली : तोंडी तलाकला सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरविले आहे. पाच पैकी तीन न्यायाधीशांनी तोंडी तलाख बेकायदा ठरविला....

11.30 AM

नवी दिल्ली : तोंडी तलाकविरोधात (ट्रिपल तलाक) संसदेत कायदा बनवावा, असे आदेश केंद्र सरकारला देतानाच तोंडी तलाकवर सहा महिने बंदी...

11.03 AM

शशिकला यांचे "अंदर-बाहर' नवी दिल्ली: बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी अटकेत असलेल्या अण्णा द्रमुकच्या प्रमुख व्ही. के. शशिकला...

07.24 AM