पुढील निकाल येईपर्यंत वाट पाहा: मल्ल्या

वृत्तसंस्था
बुधवार, 14 जून 2017

"भारतीय माध्यमे माझ्याविरोधात तीव्र द्वेष पसरवत आहेत. भारत सरकारने दाखल केलेल्या खटल्याचा निर्णय ब्रिटन कोर्टात होणार आहे. निर्णय येईपर्यंत वाट पाहा.", असे मल्ल्या यांनी ट्विट केले. 

नवी दिल्ली - देशातील विविध बँकांचे कर्ज बुडवूनदेखील ब्रिटन न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर उद्योगपती विजय मल्ल्याने माध्यमांवर तोफ डागली आहे. भारतीय माध्यमे माझ्याविरोधात द्वेष पसरवत आहेत, असा आरोप मल्ल्याने ट्विटरवरुन केला आहे. 

"भारतीय माध्यमे माझ्याविरोधात तीव्र द्वेष पसरवत आहेत. भारत सरकारने दाखल केलेल्या खटल्याचा निर्णय ब्रिटन कोर्टात होणार आहे. निर्णय येईपर्यंत वाट पाहा.", असे मल्ल्या यांनी ट्विट केले. 

मल्ल्या याला लंडन न्यायालयाने 4 डिसेंबरपर्यंत जामीन मंजूर केला. विजय मल्ल्या याचे प्रत्यार्पण करण्यासंदर्भात भारत सरकारतर्फे लंडन न्यायालयात खटला सुरू असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 जुलैला होणार आहे. त्यामुळे विजय मल्ल्याला दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी 17 मेची सुनावणी पुढे ढकलत ती आज घेण्यात आली.

कोर्टात हजेरी लावतानाच, मी कोणताही गुन्हा केलेला नाही, कोणाचीच फसवणूक केली नाही, असे म्हणत कर्जबुडव्या विजय मल्ल्याने आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळले होते. या सुनावणीसाठी विजय मल्ल्या आपल्या मुलासह हजर झाला होता. त्या वेळी त्याने त्याच्यावर असलेले सर्व आरोप फेटाळले. "निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे सबळ पुरावे आहेत,'' असेही विजय मल्ल्याने या वेळी सांगितले. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
सायकलवरून घेऊन जावा लागला भाचीचा मृतदेह​
पुणे: चार धरणांत साडेअकरा टक्के पाणीसाठा शिल्लक
बारामतीत पावसाच्या जोरदार सरी
VIDEO: लंडनमध्ये 27 मजली इमारतीला भीषण आग
डास, चिलटांमुळे भूकंप होत नाही - भाजपकडून प्रतिहल्ला
#स्पर्धापरीक्षा - 'आयएनएस चेन्नई'​
दोन मिनिटांनी मोठी निष्ठा टक्‍क्‍यांनीही पुढेच​

अमित शहांच्या दौऱ्यात शक्तीप्रदर्शनासाठी हजार रूपये
सरकार धमक्‍यांना घाबरत नाही - चंद्रकांत पाटील​