IPL बेटिंगप्रकरणी राजस्थानमधून पाच बुकींना अटक

वृत्तसंस्था
बुधवार, 17 मे 2017

इंडियन प्रिमीअर लिगमधील मॅचेसवर बेटिंग लावण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी शहरातून पाच जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 43 मोबाईल्स, दोन लॅपटॉप आणि कोट्यवधी रुपये असलेल्या बॅंकेच्या खात्यांसदर्भातील कागदपत्रे जप्त केली आहेत.

भिलवाडा (राजस्थान) : इंडियन प्रिमीअर लिगमधील मॅचेसवर बेटिंग लावण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी शहरातून पाच जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 43 मोबाईल्स, दोन लॅपटॉप आणि कोट्यवधी रुपये असलेल्या बॅंकेच्या खात्यांसदर्भातील कागदपत्रे जप्त केली आहेत.

भिलवाडामधील प्रतापनगर येथे बेटिंग करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने केलेल्या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या पथकामध्ये प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी मृदुल कछवा, दिनेश कुमार, प्रतापनगर पोलिस स्थानकाचे प्रभारी नवनीत व्यास, हमीगढ पोलिस स्थानकाचे प्रभारी गिरीराज सिंह आणि अनेक पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश होता. जिलानी शेठ यांच्या मालकीच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी तेथे टोळी सापडली. आरोपींच्या चौकशी करण्यात येत असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.