इरोम शर्मिला या ब्रिटीश मित्राशी होणार विवाहबद्ध

वृत्तसंस्था
सोमवार, 8 मे 2017

इंफाळः मणिपूरमधून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अस्फा) मागे घेण्याच्या मागणीसाठी 16 वर्षे उपोषण करणाऱया इरोम शर्मिला या आपल्या ब्रिटीश मित्रासोबत जुलै महिन्यात विवाहबद्ध होणार आहेत.

शर्मिला यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, 'देसमाँड कौटीन्हो या मित्रासोबत जुलै महिन्यात विवाहबद्ध होणार आहे. विवाहाची तारीख अद्याप निश्चित केलेली नाही. परंतु, तमिळनाडूमध्ये जुलै महिनाखेर पर्यंत विवाह करणार आहे.'

विवाहानंतरही आपले काम सुरूच राहणार आहे. राजकीय म्हणून नव्हे तर सर्वसामान्य कार्यकर्ती म्हणून. यापुढे राजकीय निवडणूक लढवायची नाही हे आपम ठरवले आहे. विवाहानंतर तमिळनाडूमध्येच राहण्याचा विचार आहे. देसमाँड हा सुद्धा भारतातच राहणार असून, त्याला परवानगी मिळाली आहे. शिवाय, विवाहासाठी तो भारतात दाखल झाला आहे, असेही शर्मिला यांनी सांगितले.