'या भारतीय पत्रकाराला बाहेर हाकला'

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली - या भारतीय पत्रकाराला बाहेर हाकलून द्या, हे वक्तव्य आहे न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव यांच्या पत्रकार परिषदेतील.

पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी हे अमेरिका दौऱ्यावर आहेत. न्यूयॉर्कमधील रुसवेल्ट हॉटेलमध्ये चौधीर यांची पत्रकार परिषद होणार होती. या पत्रकार परिषदेला एनडीटीव्ही वृत्तवाहिनीची पत्रकार नम्रता बरार उपस्थित होत्या. पण, पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वीच या भारतीयाला बाहेर हाकलून द्या, असे आदेश देण्यात आले.

उरी येथील लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 18 जवान हुतात्मा झाले आहेत. या हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानवर दबाव निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. याचा प्रत्यय अमेरिकेतील या पत्रकार परिषदेतील दिसून आला. भारतीय पत्रकाराला या परिषदेत सहभागी करून घेण्यात आले नाही.