'ऑगस्टा प्रकरणी'' पुन्हा सुनावणी होणार

वृत्तसंस्था
सोमवार, 19 डिसेंबर 2016

दरम्यान, भारतात या प्रकरणावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झडत आहेत. या प्रकरणाच्या तपासाने वेग घेतला असून, या गैरव्यवहाराशी नाव जोडलेल्या माजी हवाईदल प्रमुख एस. पी. त्यागी व अन्य दोघांना नुकतीच अटक करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - ऑगस्टा वेस्टलॅंड लाच प्रकरणाची सुनावणी पुन्हा घेण्याचे आदेश इटलीच्या सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच दिले आहेत. भारताने 2010 मध्ये फिनमेनिका समूहाची उपकंपनी असलेल्या ऑगस्टाकडून 12 हेलिकॉप्टरची खरेदी केली होती. या व्यवहारात लाचखोरी झाल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी मिलानमधील अपिलीय न्यायालयात एप्रिलमध्ये सुनावणी झाली होती. त्या वेळी समूहाचे प्रमुख गिसेप्पी ओर्सी यांना साडेचार वर्ष तर, ऑगस्टाचे माजी प्रमुख ब्रुनो स्पॅन्जोलिनी यांना चार वर्ष कैदेची शिक्षा सुनावण्यात आली होती. संबंधितांनी या निकालावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून आता याप्रकरणी नव्याने सुनावणी होणार आहे. याप्रकरणी पुन्हा सुनावणी होऊन निकालात कोणत्याही प्रकारे बदल झाला तर, त्याचे भारतावर दूरगामी परिणाम होतील, अशी शक्‍यता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) व्यक्त केली आहे.

दरम्यान, भारतात या प्रकरणावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झडत आहेत. या प्रकरणाच्या तपासाने वेग घेतला असून, या गैरव्यवहाराशी नाव जोडलेल्या माजी हवाईदल प्रमुख एस. पी. त्यागी व अन्य दोघांना नुकतीच अटक करण्यात आली आहे.

देश

रायपूर - छत्तीसगड राज्याची राजधानी असलेल्या रायपूर येथील सरकारी रुग्णालयामध्ये...

01.48 PM

नवी दिल्ली : डोकलाम येथे भारत आणि चीन यांच्यादरम्यान निर्माण झालेल्या पेचावर लवकर तोडगा निघेल. चीन याबाबत सकारात्मक पाऊल उचलेल,...

01.15 PM

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे सध्या तळगाळातील लोकांमध्ये भाजपची प्रतिमा निर्माण करून पक्षाची...

11.54 AM