काश्मीरमध्ये सोशल मिडीया साईट्सवर बंदी

वृत्तसंस्था
बुधवार, 26 एप्रिल 2017

सरकारने फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, वुईचॅट, ओझोन, गुगल प्लस, बायडू, स्काईप, व्हायबर, लाईन, स्नॅपचॅट, पिंटरेस्ट, टेलिग्राम, रेडीट, स्नॅपफीश, युट्यूब (अपलोड), व्हाईन, बझनेट, फ्लिकर अशा 22 साईटवर बंदी घातली आहे.

श्रीनगर - हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर सरकारने महिनाभरासाठी 22 सोशल मिडीया साईट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात अशांततेचे वातावरण असून, विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरवात केली आहे. यामुळे सरकारने फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, वुईचॅट, ओझोन, गुगल प्लस, बायडू, स्काईप, व्हायबर, लाईन, स्नॅपचॅट, पिंटरेस्ट, टेलिग्राम, रेडीट, स्नॅपफीश, युट्यूब (अपलोड), व्हाईन, बझनेट, फ्लिकर अशा 22 साईटवर बंदी घातली आहे.

गृह मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की या सर्व सोशल साईट्सवर 17 एप्रिलपर्यंत बंदी असणार आहे. 3 जी आणि 4 जी मोबाईलवरील सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. तर, ब्रॉडबँडचा स्पीड 2 जी करण्यात आला आहे. या साईट्सवरून कोणताही संदेश पाठविता येणार नाही. पुढील निर्णय घेईपर्यंत ही बंदी असेल.