कर्नाटकात 'जय महाराष्ट्र' म्हणणाऱ्यांचे पद होणार रद्द!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

बेळगाव : कर्नाटक सरकार व कन्नड विरोधी भूमिका घेणाऱ्या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करणारा नवा कायदा लवकरच संमत केला जाईल, अशी माहिती नगरविकासमंत्री रोशन बेग यानी सोमवारी प्रसारमाध्यमांना दिली.

कर्नाटकविरोधात घोषणा व अन्य राज्यांचा जयजयकार करणाऱ्या नगरसेवकांना यामुळे चाप बसेल असे ते म्हणाले. विधीमंडळाच्या पुढील अधिवेशनात यासंदर्भातील दुरूस्ती विधेयक मांडले जाईल. विधेयक मंजूर झाल्यानंतर महापालिका कायद्यात दुरूस्ती केली जाईल असेही ते म्हणाले. सीमाभागातील मराठी नगरसेवक आपल्या भाषणाच्या शेवटी जय महाराष्ट्र असे म्हणतात.

काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी होतात. त्यामुळे मराठी नगरसेवकानी भविष्यात कर्नाटक विरोधात घोषणा देवून नयेत. महाराष्ट्र राज्याचा जयघोष करू नये व त्यांनी काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी होवू नये यासाठीच कायदा दुरूस्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी बेग महापालिकेत आढावा बैठक घेणार आहेत. त्यावेळी नगरसेवकांना याची माहिती देणार आहेत.

व्हिडीओ गॅलरी