अमित शहा आजपासून राजस्थान दौऱ्यावर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 जुलै 2017

जयपूर: राजस्थानमध्ये पुढील वर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुका आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची कशा प्रकारे तयारी झाली आहे, याची पाहणी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा उद्यापासून (ता. 21) तीन दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर येत आहेत.

शहा या दौऱ्यात भाजपच्या राज्य कार्यकारिणी, समन्वय समिती, मंत्रिमंडळातील सदस्य, खासदार, आमदार यांच्यासह जिल्हाध्यक्ष आणि अन्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशोक परनामी यांनी सांगितले. त्याशिवाय ते प्रमुख व्यक्तींशी चर्चाही करणार आहेत, असे ते म्हणाले. शहा यांच्या दौऱ्याची तयारी पूर्ण झाली आहे. 2019मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष तळागाळापर्यंत पोचावा, यासाठी ते करीत असलेल्या राष्ट्रव्यापी दौऱ्याचाच एक भाग आहे.