मुलीला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

वृत्तसंस्था
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

जयपूर : येथील इसरवल गावात प्रियकराने वडिलांच्या मदतीने मुलीला मारहाण करून तिला जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीला उदयपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

पीडित मुलगी शनिवारी सायंकाळी घरी जात असताना रवी नावाच्या मुलाने तिला थांबविले आणि तिला थप्पड मारली. रवीच्या वडिलांनीही त्याला साथ दिली, असे सदर पोलिस ठाण्याचे मनीष चरण यांनी सांगितले. पीडित मुलीने आपल्या जबाबात म्हटले आहे की, रवीने आपल्या अंगावर केरोसीन टाकले, मात्र आपल्याला कोणी पेटविले हे माहीत नाही, असे पोलिसांनी सांगितले. रवीचे पीडित मुलीवर एकतर्फी प्रेम होते. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, रवी या मुलीचा अनेक दिवसांपासून पाठलाग करीत होता. ज्या वेळी मुलीने बोलण्यास नकार दिला, त्या वेळी त्याने या प्रकारचे कृत्य केले, असे चरण म्हणाले.