अखनूर सेक्टरमध्ये दहशतवादी हल्ला; तिघांचा मृत्यू

वृत्तसंस्था
सोमवार, 9 जानेवारी 2017

आज पहाटे अंधाराचा फायदा घेत दहशतवाद्यांनी अखनूर सेक्टरमधील बाटल गावाजवळील जीआरईएफच्या कॅम्पवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी कॅम्पच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात तीन कामगारांचा मृत्यू झाला.

जम्मू - जम्मू काश्मीरमधील खौर भागातील अखनूर सेक्टरमध्ये आज (सोमवार) पहाटे दहशतवाद्यांनी जनरल रिझर्व्ह अभियांत्रिकी दलाच्या (जीआरईएफ) कॅम्पवर केलेल्या हल्ल्यात तीन कामगारांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे अंधाराचा फायदा घेत दहशतवाद्यांनी अखनूर सेक्टरमधील बाटल गावाजवळील जीआरईएफच्या कॅम्पवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी कॅम्पच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात तीन कामगारांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले.

या परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून, दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. बाटल गावाजवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलिकडून (एलओसी) दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसून हल्ला केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एलओसीपासून हा कॅम्प दोन किमी अंतरावर आहे. लष्कर आणि पोलिसांकडून हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

देश

नवी दिल्ली : ब्ल्यू व्हेल गेममुळे केरळ आणि देशाच्या अन्य भागात होणाऱ्या मुलांच्या आत्महत्या पाहता राष्ट्रीय बालहक्क संरक्षण...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

पाटणा : बिहारमधील पूरस्थिती आज आणखी गंभीर झाली असून, राज्यातील पूरबळींची संख्या आता 98 वर पोचली आहे. पुरामुळे 15 जिल्ह्यांतील 93...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

कोडाईकॅनल (तमिळनाडू) - मणिपूरमधून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफस्पा) मागे...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017