लष्कराला मोठं यश, पाकिस्तानच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Indian Army
Indian Armyesakal
Summary

जम्मू-काश्मीरमध्ये आज भारतीय लष्कर आणि पोलिसांना मोठं यश मिळालंय.

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) मंगळवारी भारतीय लष्कर (Indian Army) आणि पोलिसांना मोठं यश मिळालंय. कुपवाडामध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तौयबाच्या (Lashkar-e-Taiba) दोन दहशतवाद्यांचा (Terrorists) खात्मा करण्यात आलाय, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यानं दिलीय. मारल्या गेलेल्यांमध्ये एका पाकिस्तानी दहशतवाद्याचाही समावेश असल्याचं त्यांनी सांगितलंय.

कुपवाडा येथील चतारस कंडी भागात झालेल्या चकमकीची माहिती पोलिसांना मिळाली होती. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितलं की, एलईटीचे दोन दहशतवादी मारले गेले आहेत. यात पाकिस्तानी दहशतवादी तुफैलचाही हात असल्याचं त्यांनी म्हटलंय. सध्या परिसरात लष्कर आणि पोलिसांची शोधमोहीम सुरूय.

Indian Army
सावधान! कोरोना पुन्हा वाढतोय; 'या' बड्या शहरांत सर्वाधिक कोविडचं संक्रमण

बारामुल्ला जिल्ह्यात सोमवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तौयबाचा एक पाकिस्तानी दहशतवादी ठार झाला, तर तीन दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी ही माहिती दिलीय. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, सोपोरच्या जालूर भागातील पाणीपुरा जंगलात दहशतवाद्यांवर कारवाई करत सुरक्षा दलांनी तिथं घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com