अमरनाथ यात्रेसाठी 21वी तुकडी रवाना

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 जुलै 2017

जम्मू : जम्मूहून आज 21वी तुकडी कडक सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाली. या तुकडीतून एक हजार 877 भाविक पवित्र अमरनाथच्या दर्शनाला रवाना झाले. त्यामुळे बुधवारी सायंकाळपर्यंत अमरनाथच्या पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतलेल्या भाविकांची संख्या दोन लाख 22 हजार 619 इतकी झाली आहे.

यात्रेसाठी आज रवाना झालेल्या तुकडीत 62 हजार 160 भाविक आहेत. या तुकडीला केंद्रीय राखीव पोलिस दल आणि पोलिसांचे मोठे संरक्षण देण्यात आले असून, या तुकडीत एक हजार 360 पुरुष,492 महिला आणि 25 साधू 40 वाहनांच्या ताफ्यातून रवाना झाले, असे सूत्रांनी सांगितले. यंदाच्या वर्षी सरकारने या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था पुरविली असून लष्कर, सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलिस दल मिळून 35 ते 40 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यंदा या यात्रेचा कालावधी आठ दिवसांनी कमी करण्यात आला असून, सात ऑगस्ट रोजी ही यात्रा संपणार आहे.