अमरनाथ यात्रेची झाली सांगता

वृत्तसंस्था
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

श्रीनगर: गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेली अमरनाथ यात्रेची आज सांगता झाली. यंदाच्या वर्षी अडीच लाख भाविकांनी पवित्र अमरनाथ गुहेचे दर्शन घेतले. या यात्रेदरम्यान बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आठ प्रवासी ठार झाले होते. दरवर्षी राखी पौर्णिमेच्या दिवशी या यात्रेचा समारोप होतो. गेल्या 14 वर्षांतील यात्रेकरूच्या संख्येपेक्षा यंदाच्या यात्रेकरूंची संख्या ही खूपच कमी होती. गेल्या वर्षी दोन लाख 20 हजार भाविकांनी अमरनाथ यात्रेचे दर्शन घेतले होते.

भगवान शंकराची गदा, छडी मुबारक यांच्यासह महंत दीपेंद्र गिरी यांच्यासह साधूंचा समूह यांचे आज अमरनाथ गुहेत आगमन झाले. त्यानंतर दिवसभर भजन-कीर्तनाचा कार्यक्रम झाला, असे अमरनाथ श्राइन बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अमरनाथची पवित्र गुहा आजपासून दर्शनासाठी बंद होईल. त्याचप्रमाणे उद्या पहलगाम येथे लीडर नदीच्या तीरावर छडी मुबारकचा पूजेचा आणि विसर्जनाचा कार्यक्रम होईल.