हिज्बुल मुजाहिदीनचे दोन दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

श्रीनगरः जम्मू - काश्‍मीरच्या कुलगाम जिल्ह्यांत आज झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिदीनचे दोन दहशतवादी ठार झाले, तर एका दहशतवाद्याने शरणागती पत्करली.

पोलिस प्रवक्‍त्याने सांगितले की, खुदवानी गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस, लष्कर व "सीआरपीएफ'ने संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केली. या वेळी जवानांनी दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले. या वेळी दोन दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार करीत पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात हे दोन्ही दहशतवादी ठार झाले; तर उरलेला एक दहशतवादी शरण आला. आरिफ अहमद सोफी असे त्याचे नाव आहे.''

दाऊद अहमद आणि सयर अहमद वणी अशी मृतांची नावे आहेत. हावोरा येथील सरपंचाच्या हत्येत या दोन दहशतवाद्यांचा हात होता. त्याचप्रमाणे काश्‍मिरी युवकांना दगडफेक करण्यास प्रोत्साहन देण्यात दाऊदचा हात असल्याचे प्रवक्‍त्याने सांगितले. या दहशतवाद्यांकडून एके 47 रायफल, दोन मॅगेझीन्स, 63 राउंड, एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.