'पाक'चा गोळीबार तिसऱ्या दिवशीही सुरूच

वृत्तसंस्था
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

श्रीनगर: सीमेवरील उरी सेक्‍टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून सुरू असलेला गोळीबार आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच असून, ही माहिती लष्करातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

खबरदारी म्हणून या भागातील शाळा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या असून, आज सकाळीही शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना समोर आल्या आहेत. रविवारी कमलकोट भागात पाकने केलेल्या गोळीबारात लष्करातील एका हमालाचा मृत्यू झाला होता, तर अन्य दोन महिला जखमी झाल्या होत्या. त्यानंतर अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची बाब समोर आली नसल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

चालू वर्षात 105 वेळा शस्त्रसंधीचा भंग
गेल्या नऊ महिन्यात पाकिस्तानी सैन्याकडून 105 वेळा शस्त्रसंधीचा भंग झाल्याची माहिती बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने दिली. यात बीएसएफच्या एका जवान, एक महिला व अन्य 19 जणांचा मृत्यू झाला असून, शस्त्रसंधीचा भंग करताना डागलेल्या तोफगोळ्यांमुळे आतापर्यंत सात जवान, 12 नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. या काळात सीमेलगतच्या 30 ते 40 गावांवर तोफगोळे डागण्यात आले. त्यात अनेक घरांची पडझड झाली. गेल्या महिन्यात भीतीमुळे सुमारे 10 हजार नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

2002 पासून आतापर्यंतची स्थिती
पाकिस्तानी सैन्याने 2002 पासून आतापर्यंत एकूण 12 हजार वेळा शस्त्रसंधीचा भंग केला असून, त्यात सुमारे सुरक्षा दलातील 144 जवान आणि 313 नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. केवळ 2004, 2005 आणि 2007 ही वर्षे याला अपवाद ठरली असून, या काळात एकदाही शस्त्रसंधीचा भंग झाला नव्हता.