बनिहालचा तिसरा हल्लेखोर दहशतवादी अटकेत

वृत्तसंस्था
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

जम्मू : बनिहाल येथील एका खासगी कंपनीची सुरक्षा करणाऱ्या एसएसबी जवानांवर हल्ला करणाऱ्या तिसऱ्या दहशतवाद्याला पोलिसांनी काल रात्री अटक केली आहे. यासंदर्भात पोलिस महासंचालक वसंत रथ यांनी माहिती दिली. या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक मुश्‍ताक चौधरी आणि एसएसपी रामबन मोहन लाल यांचे अभिनंदन केले आहे.

तिसऱ्या दहशतवाद्याचे नाव वाहिद नजीर (वय 21) असे असून, तो कासकोट बनिहालचा रहिवासी आहे. तो अनंतनागच्या डिग्री कॉलेजमध्ये बीएसएसीला शिकत होता. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास मोहीम राबवत त्याला नौगाम बनिहाल येथून ताब्यात घेतले. काल रात्री उशिरापर्यंत एसएसपी मोहन लाल आणि त्यांचे पथक चौकशी करत होते.

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी पोलिस महासंचालक एस. डी. जम्वाल यांनी एका पत्रकार परिषदेत दोन दहशतवाद्यांना पकडल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पोलिस तिसऱ्या आरोपीच्या तपासात असल्याचे सांगितले होते. हल्लेखोर दोन दहशतवादी डिग्री कॉलेजचे विद्यार्थी होते, तर तिसरा दहशतवादी त्याच कंपनीत कामाला होता. 20 सप्टेंबर रोजीच्या हल्ल्यात एसएसबीच्या हेडकॉन्स्टेबलचा मृत्यू झाला, तर सहायक पोलिस निरीक्षक जखमी झाले होते.

Web Title: jammu-kashmir news terrorist arrested